गोवर आता किशोरवयीन मुलांमध्येही आढळतोय…

मुंबईत लहान मुलांमध्ये गोवरची साथ पसरल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने प्रतिबंधात्मक लस देण्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांच्या केसेसमध्ये गोवर केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर किशोरवयीन मुलांमध्येही आढळून आल्याच्या नोंदी दिसून येत असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. गोवर या संसर्जन्य आजारांवर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे, अन्यथा मृत्यू ओढावू शकतो.

( हेही वाचा : ६० मिनिटांत ६१ महिलांना ब्रायडल मेकअप; पुण्यातील महिलेला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान!)

मुंबईतील एम -पूर्व , एल विभाग , एफ – उत्तर ,पी-उत्तर ,एच-पूर्व ,एम-पश्चिम या भागांत गोवरची साथ आली आहे. सप्टेंबर महिन्यांपासून आतापर्यंत ८४ तर यंदाच्या वर्षांत संपूर्ण मुंबईत १०९ रुग्ण आढळल्याने पालिकेसह राज्य तसेच केंद्रीय यंत्रणाही आता मुंबईतील गोवरची साथ कमी करण्यासाठी कामाला लागली आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार अशक्त मुलांना सहज होतो. कुपोषित मुलांना गोवरची बाधा झाल्यास उपचारांमध्ये व्यत्यत येतो, अशी भीतीही राज्य आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

शरीरावर पूरळ येत असेल तर कानाडोळा नको

ताप, सर्दी, खोकला ही गोवरची प्राथमिक लक्षणे आहेत. इन्फ्लूएन्झा आजाराचीही लक्षणे सारखीच असल्याने कित्येकदा गोवर ओळखणे कठीण होऊन बसते. मूलाच्या संपूर्ण शरीरावर पूरळ येण्यास सुरुवात झाली की, मुलाला गोवरची बाधा होत असल्याचे संकेत असते. या लक्षणाकडे कानाडोळा नको, असा इशारा बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिला.

गोवर नियंत्रणात न आल्यास

डोळ्यांचे विकार जडण्याची शक्यता, कित्येकदा न्यूमोनियाही होतो

उपचारपद्धती 

गोवरबाधित मुलांमध्ये अ जीवनसत्त्वाची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून येते. त्यामुळे शरीरात अ जीवनसत्त्व वाढवणे तसेच संशयित रुग्णांना प्रतिबंधात्मक लस देणे हा खात्रीशीर उपाय समजला जातो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here