राज्यात यंदाच्या वर्षांत गोवर रुग्णांची संख्या सहाशेपार

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यात मुंबईपाठोपाठ मालेगाव, भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत ६५८ गोवरची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण १० हजार २३४ गोवरचे संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात ५५ भागांत उद्रेक झाल्याचेही आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

( हेही वाचा : दिल्लीत ‘प्रेस कॉन्फरन्स’मधील रॅपिड प्रश्नांवर रणजित सावरकरांची उत्तरांची ‘फायरिंग’)

मुंबईत गोवरच्या १३ मृत्यूंपैकी केवळ एका बालकानेच गोवरप्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला होता, याबाबत राज्य आरोग्य विभागाने खुलासा केला. १३ पैकी ७ मुले तर ६ मुली होत्या.

गोवरमुळे राज्यात १३ बालकांचा मृत्यू झाला आहे

 • संशयित गोवरबाधित रुग्णांची संख्या – ९
 • निश्चित निदान झालेल्या मृतांची संख्या – ४

वयोगट –

 • ० ते ११ महिने – ३
 • १२ महिने ते २४ महिने – ८
 • २५ महिने ते ६० महिने – २

जिल्हानिहाय बाधित रुग्णांची संख्या

जिल्हा – बाधित रुग्णांची संख्या – मृत्यूची संख्या

 • मुंबई – २६० – १०
 • मालेगाव – ६२ – ०
 • भिवंडी – ४६ – २
 • ठाणे मनपा – ४४ – ०
 • ठाणे जिल्हा – १५ – ०
 • वसई-विरार – ११- १
 • पनवेल – ५ – ०
 • नवी मुंबई – १२ – ०

गोवरविषयी –

 • गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे  पाचवर्षांखालील मुलांमध्ये आढळतो.
 • ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेह-यावर आणि नंतर शरीरावर लाल, सपाट पुरळ दिसून येतात
 • काही बालकांना गोवरची लागण झाल्यानंतर अतिसार, कानाचा संसर्ग, न्यूमोनिया, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here