मुंबईत गोवरची संख्या आटोक्यात येत असताना आता गोवंडीपाठोपाठ कुर्ला येथेही गोवरचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. कुर्ला येथे अगोदर आठवड्याला १५ ते २० गोवरचे नवे रुग्ण सापडत होते. आता ही संख्या ५ ते ७ वर खाली घसरली आहे. मुंबईत आता एकूण गोवरबाधितांची संख्या ५०६ वर पोहोचली असून, सध्या गोवर उद्रेक ब-यापैकी आटोक्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.
गोवंडी पाठोपाठ कुर्ला येथेही गोवरचे ७१ रुग्ण सापडलेत. गोवंडीत ७ तर कुर्ला येथे पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांत १३ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी काजूपाडा, मोहिली व्हिलेज यासह अजून दोन ठिकाणी गोवरचे रुग्ण पाहायला मिळत आहेत, असेही आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
( हेही वाचा: भायखळ्यात वाचा चकटफू )
गेल्या आठवड्यात ३ गोवरबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यापैकी दोन जणांना डिस्चार्ज दिला गेला. गुरुवारी अजून एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर उपचार सुरु करावे लागले. गुरुवारी ३७ संशयित रुग्णांना गोवरच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले तर ३३ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला आहे.
Join Our WhatsApp Community