गोवरची वाढती संख्या लक्षात घेता देशात नवा साथरोग पसरल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. गोवर प्रतिबंधासाठी आता सहा महिन्यांपासून अतिरिक्त लस मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने गोवरची साथ येत्या दोन महिन्यांतच आटोक्यात येईल, अशी माहिती नेरुळ येथील डी.व्हाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीनच्या मायक्रॉबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अभय चौधरी यांनी व्यक्त केली.
गोवर आटोक्यात येण्यासाठी तातडीने सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेमुळे गोवरचा फैलाव दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणार नाही, असेही डॉ चौधरी म्हणाले. गोवरचा उद्रेक झालेल्या ठिकाणी नवजात बालकांना मातांनी घराबाहेर फार काळ नेऊ नये, तसेच अतिरिक्त लसीकरणासाठी निवडल्या गेलेल्या लसीकरण केंद्रातही लसीकरण मोहिमेला पालकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ चौधरी यांनी केले.
(हेही वाचा आता धुळ्यात Love Jihad; शरीराचे 70 तुकडे करण्याची धमकी)
पालिका आरोग्य विभागाची लसीकरण मोहीम
- ९ महिने ते ५ वयापर्यंत ४१ आरोग्य केंद्रातील १ लाख ६२ हजार २९५ बालकांना गोवर-रुबेला लसीची विशेष मात्रा दिली जाईल
- ६ महिने ते ९ महिन्यापर्यंतच्या १४ आरोग्य केंद्रातील ९ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या ३ हजार ५६९ बालकांना गोवर-रुबेला लसीची विशेष मात्रा दिली जाईल.
- मुंबईत शुक्रवारपर्यंत आढळलेल्या गोवरबाधितांची संख्या – ३७१
- शुक्रवारी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या – ३३
- डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – ३३