गोवरचे ४ हजार ३५५ संशयित रुग्ण

100

मुंबईत परळ-शिवडी विभागातही गोवरचे रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. १ डिसेंबरपासून मुंबईत ६ ते ९ महिन्यांमधील २० बालकांना तर ९ महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या १ हजार १४२ रुग्णांना अतिरिक्त गोवरप्रतिबंधात्मक डोस दिला गेला. गोवरची साथ वाढत असलेल्या भागांत अतिरिक्त गोवरप्रतिबंधात्मक लस सुरु केली जावी, अशी सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने केल्यानंतर हा डोस १ डिसेंबरपासून मुंबईत सुरु झाला आहे.

( हेही वाचा : नवे हृदय मिळाल्यानंतर रुग्ण पाच दिवसांतच चालू लागला…)

मुंबईत आता ३४६ रुग्णांना गोवरची बाधा झाली आहे. तर सोळा विभागांत गोवरची साथ पसरली आहे. १ डिसेंबरला ८३ ताप व पूरळचे संशयित रुग्ण दिसून आले. तर ४ हजार ३५५ संशयित रुग्ण दिसून आले. गुरुवारी ४५ रुग्णांना रुग्णालयात दाखल होत उपचार दिले गेले. तर ३० रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. मुंबईत पालिका आरोग्य विभागाने ८ गोवरचे निश्चित मृत्यू असल्याचे स्पष्ट केले आहे. तर ४ रुग्णांचा संशयित रुग्ण असून, ३ निश्चित रुग्ण मुंबईबाहेरील आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.