मुंबईत तब्बल ५८४ गोवरचे संशयित रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका एमआर १ आणि एमएमआर अशा दोन्ही लसी देत आहेत. एमआर १ प्रकाराच्या ४ हजार ९४७ तर एमएमआर प्रकाराच्या ३ हजार ७२८ लसी बालकांना प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. गोवरच्या साथीची गांभीर्यता लक्षात घेत केंद्रीय व राज्य आरोग्य विभागाच्या टीम मुंबईत दाखल झाल्या आहेत.
( हेही वाचा : UTS ॲपद्वारे ५ किलोमीटर अंतरावरून काढता येणार लोकलचे तिकीट; जाणून घ्या नवे नियम )
मुंबईत गोवरचा एम पूर्व हा हॉटस्पॉट होत चालला आहे. सप्टेंबर महिन्यापासून एम पूर्व विभागात ८४ रुग्ण आढळलेले असताना एम आर१ प्रकाराच्या ५० तर एमएमआर प्रकाराच्या ७४ लसी देण्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. एम-पूर्व विभागानंतर एल, एफ-उत्तर,एच-पूर्व,एम-पूर्व तसेच पी-उत्तर विभागात गोवरचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी केंद्रीय व राज्य आरोग्य विभागाची टीम प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणार आहे. शुक्रवारी मंत्रालयात दोन्ही टीम सायंकाळी उशिरापर्यंत चर्चासत्रात सहभागी झाली होती. मात्र या केसेसबाबत जाचपडताळणी करण्यात आली. शनिवारी प्रत्यक्षात थेट दिल्यानंतर संपूर्ण अहवाल तयार होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्यावतीने सुरु असलेले खबरदारीचे उपाय
- संशयित रुग्णांना अ जीवनसत्त्व दिले जात आहे.
- आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जाईल.
- ९ महिने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणासह वैद्यकीय अधिका-यांमार्फत बालकांची तपासणी करण्यात येईल.