प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एसटी महामंडळ आता यांत्रिक कर्मचा-यांना ‘चालक’ आणि वाहतूक नियंत्रकांना ‘वाहक’ म्हणून नेमणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे एसटी सेवा सुरळीत सुरु राहावी, म्हणून एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणून महामंडळाने घेतला निर्णय
गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामध्ये चालक आणि वाहक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसत आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळ घेत आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
हेही वाचा:
सरकारी नोकरी अपडेट! ‘या’ विभागात होणार ‘२७७६’ पदांची भरती!
Weekend ला राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!
प्रोत्साहन भत्ता दिला जाणार
एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली. त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. ज्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे, अशा कर्मचा-यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करुन त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करुन प्रवासी वाहन बिल्ला काढायचा आहे. या कर्मचा-यांना प्रतिदिन 300 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने आपल्या आदेशात केली आहे.
वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करून हिंदुस्थान पोस्टच्या अधिकृत ग्रुपमध्ये सहभागी व्हा.