पूर्व मुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वे आणि सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता अर्थात एससीएलआर या रस्त्यांवर आठवड्यात दोनदा यांत्रिक झाडून सफाई केली जात होती, तिथे आता दरदिवशी या यांत्रिक झाडूनेच सफाई केली जाणार आहे. हे दोन्ही मार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा या झाडून तर उर्वरीत दिवशी कर्मचाऱ्यांद्वारे सफाई केली जात होते. परंतु हे मार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्याने या मार्गाची सफाई कायमस्वरुपी यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. (Mechanical Sweeping)
पूर्व मुक्त मार्ग आणि सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता हा रहदारीचा असल्याने व दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा विचार करता या कामात नव्याने झालेल्या पुलांच्या साफसफाईची कामाची व्याप्ती लक्षात सर्वच दिवस ही सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार महापालिका प्रशासनाने या दोन्ही मार्गाची सफाई मनुष्याद्वारे न करता आठवड्याचे सातही दिवस यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय घेत यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. (Mechanical Sweeping)
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : वंचितला नाना पटोलेंचे वावडे; महाविकास आघाडीत येण्याआधी सातशे साठ विघ्न)
यासाठी यांत्रिक झाडूद्वारे साफसफाई करण्यासाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड केली असून या कंपनीवर पुढील दोन वर्षांकरता जबाबदारी सोपवली आहे. या या दोन वर्षांकरता सव्वा तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी प्रतिदिन प्रति किलोमीटरसाठी ११०२ रुपये खर्च करण्यात आला होता, तर आता यासाठी पहिल्या वर्षी प्रतिदिन प्रति किलोमीटरसाठी १२७४ रुपये म्हणजे १७० रुपये अधिक मोजले जाणार आहे. तर दुसऱ्या वर्षी १३२५ रुपये मोजले जाणार आहे. (Mechanical Sweeping)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community