Mechanized Parking : वरळी हबच्या ठिकाणी बांधले जाणार सुमारे ७५० वाहनांसाठी यांत्रिकी वाहनतळ

यापूर्वीच्या दोन यांत्रिकी वाहनतळांचे काम दोन वर्षांपासून रखडले

859
Mechanized Parking : वरळी हबच्या ठिकाणी बांधले जाणार सुमारे ७५० वाहनांसाठी यांत्रिकी वाहनतळ
Mechanized Parking : वरळी हबच्या ठिकाणी बांधले जाणार सुमारे ७५० वाहनांसाठी यांत्रिकी वाहनतळ

मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने माटुंगा मध्य  रेल्वे, मुंबादेवी मंदिर पाठोपाठ (Mechanized Parking) आता फोर्ट येथील हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागेत अत्याधुनिक यांत्रिक वाहनतळ उभारण्यात येत असतानाच आता (Mechanized Parking) वरळी हब येथील जागेतही अशाप्रकारचे वाहनतळ उभारण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे.  माटुंगा मध्य  रेल्वे आणि मुंबादेवी मंदिर  आदी परिसरात  वाहनतळाची उभारणी  मागील दोन वर्षांपासून झालेली नाही. त्यानंतर हुतात्मा चौक तिसऱ्या वाहनतळानंतर वरळी हब येथील मोकळ्या जागेत चौथे यांत्रिक वाहनतळ उभारण्यात येत आहे. (Mechanized Parking)

वाहनतळासाठी विविध करांसह ३०९.५२ कोटी रुपये खर्च 

 मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) ‘जी/दक्षिण’ विभागातील अभियांत्रिकी केंद्र (इंजिनिअरींग हब) समोरील जागेत यांत्रिकी वाहनतळ अर्थात शटल व यांत्रिकी सिस्टीमवर आधारीत उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने (Municipal Corporation) घेतला आहे. वरळीतील या वाहनतळामध्ये ६४० चारचाकी आणि ११२ दुचाकींचा वाहनांचा समावेश असेल अशाप्रकारचा आराखडा बनवला आहे.  हे वाहनतळ २३ मजली असेल आणि त्यातील ३ मजले हे वाहनतळ हे महापालिका कार्यायालयाकरता असेल. आणि २० मजले हे यांत्रिकी वाहनतळासाठी असेल. तर दोन तळ घरांपैंकी एक तळघर हे प्रमुख सुरक्षा अधिकारी यांच्या विभागासाठी शस्त्रे ठेवण्यासाठी असतील आणि उर्वरीत तळघरामध्ये ११२ दुचाकी लावण्याची व्यवस्था असेल अशाप्रकारची रचना आहे. या वाहनतळासाठी विविध करांसह ३०९.५२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.  या कामांसाठी श्री एन्टरप्रायजेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mechanized Parking)

(हेही वाचा- Mudrank Abhay Yojana : मुद्रांक अभय योजनेतून पहिल्या टप्प्यात १८० कोटीहून अधिक रुपयांचे शुल्क माफ)

दोन वर्षे झाली तरी नाही कामाचा पत्ता

यापूर्वी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या जागेत वाहनतळ उभारण्यासाठी रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड  आणि मुंबादेवी येथील मोकळ्या जागेतील वाहनतळासाठी एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्या पात्र ठरल्या आहे. या दोन्ही वाहनतळासाठी पात्र कंपन्यांनी अनुक्रमे उणे २.५० टक्के तर ३.३५ टक्के दराने निविदा बोली लावून काम मिळवले. त्यामुळे या दोन्ही वाहनतळांसाठी अनुक्रमे विविध करांसह १२३  कोटी आणि १२२ कोटी रुपये एवढा खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंत्राट मंजूर होवून दोन वर्षे उलटत आली आहेत. तरीही कामे सुरू झाली नाहीत. (Mechanized Parking)

(हेही वाचा- Bomb Threat Karnataka : २५ लाख डॉलर दिले नाही तर…; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आला धमकीचा ई-मेल)

सुमारे ९५ कोटींचा खर्च 

त्यामुळे हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागेत १७६  वाहनांकरता अत्याधुनिक स्वयंचलित वाहनतळाची उभारणी करण्यात येत असून या निविदेत विशाल कंत्रकशन  या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या वाहनतळ करता सुमारे ९५ कोटी रूपये एवढा निधी खर्च केला जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार यांनी सुमारे ६२ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित म्हणून निविदा मागवली होती, त्यात पात्र ठरलेल्या कंपनीने जी.एस.टी वगळता  सुमारे ७० कोटी रुपये आणि जी एस टी सह इतर विविध कर  अशा प्रकारे या प्रकल्पाचा खर्च सुमारे ९५ कोटींच्या घरात पोहोचला आहे. (Mechanized Parking)

तब्बल ४२ टक्के अधिक दराने मिळवले काम

 कंत्राट कंपनीने महापालिकेच्या (Municipal Corporation) अंदाजित खर्चा पेक्षा ५२ टक्के अधिकची बोली लावून काम मिळवले. मात्र कंत्राटदाराने ५२ टक्के बोली लावल्याने महापालिका प्रशासनाचे नियुक्त केलेल्या सल्लागारांनी कामाचा आंदाजित खर्च सुधारित करून सुमारे ६२ कोटीवरून ६७.५१ कोटी रूपये एवढा केला. त्यानंतर कंत्राटदाराने १० टक्के दर कमी करून वाटाघाटी नंतर ४२ टक्के दरात काम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या कामाच्या अंदाजित खर्च  चुकीचा आहे की कंपनीने  जास्त दर आकारून वाढीव दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वाहनतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्ती ही संबंधित कंपनी करेल. त्यामुळे पुढील पाच वर्षाच्या खर्च गृहीत धरून हे कंत्राट देण्यात येत आहे. (Mechanized Parking)

(हेही वाचा- Mudrank Abhay Yojana : मुद्रांक अभय योजनेतून पहिल्या टप्प्यात १८० कोटीहून अधिक रुपयांचे शुल्क माफ)

आतापर्यंत  मंजूर झालेली वाहनतळ कामे

माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर

वाहतळाचे बांधकाम : १८ मजले

वाहनांची  क्षमता: ४७५

 खर्च विविध करांसह १२३

कामाला मंजूरी :  फेब्रुवारी २०२२

प्रगती: कामाला सुरूवात नाही

 काळबादेवी, मुंबादेवी मंदिराजवळ

प्रस्तावित वाहनतळाची क्षमता :  ५४६

वाहतळाचे बांधकाम : १८ मजले

विविध करांसह  १२२ कोटी रुपये

कामाला मंजूरी: फेब्रुवारी २०२२

प्रगती: कामाला अद्याप सुरूवात नाही

फोर्ट येथील हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागा

प्रस्तावित वाहनतळाची क्षमता :  १७६

खर्च विविध करांसह : ९५ कोटी रुपये

कामाला मंजूरी :  फेब्रुवारी २०२४

प्रगती : कामाला मंजुरी, कार्यादेश जारी

वरळी अभियांत्रिकी केंद्र (इंजिनिअरींग हब)

 प्रस्तावित वाहनतळाची क्षमता :  ५४६

वाहतळाचे बांधकाम :  २३ मजली

विविध करांसह   ३०९ कोटी रुपये

कामाला मंजूरी: फेब्रुवारी २०२४

प्रगती: कामाला मंजुरी, कार्यादेश जारी

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.