J.J Hospital : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जेजे रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी बांधकामाचा आढावा

बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे मंत्र्याचे निर्देश

187
 J.J Hospital : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जेजे रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी बांधकामाचा आढावा
 J.J Hospital : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जेजे रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी बांधकामाचा आढावा
भायखळा येथील जेजे सरकारी वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. जेजेतील रखडत्या सुपरस्पेशालिटी बांधकामाचा आढावा आणि रुग्णसेवेच्या सुविधांबाबत मंत्र्यांनी माहिती घेतली.
IMG 20230828 WA0017
भायखळा येथील जेजे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कमालीचे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बांधकामाचे कंत्राट स्वीकारलेल्या खासगी कंपनीकडून केवळ 25% काम पूर्ण झाले आहे.
IMG 20230828 WA0018(हेही वाचा –Mira Road Railway Station : मद्यधुंद रिक्षाचालक शिरला मीरा रोड स्थानकात)कंपनीला वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेली मुदत जुलै महिन्यातच संपली आहे. आता कंपनीला मुदत वाढवून द्यायची की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी मुश्रीफ यांनी जेजे रुग्णालयाला भेट दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालनाचे सहसंचालक डॉ अजय चंदनवाले, जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे आदी अधिकारी उपस्थित होते.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्यास अजून दीड वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांना दिली गेली. मात्र बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यानी दिले.
IMG 20230828 WA0019 1
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.