KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन

केईएम रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्म इंडीकेशनसह मेडिकल आयसोलेशन पॅनलची बसवण्यात येणार.

1672
KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन
KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन
विशेष प्रतिनिधी,मुंबई

महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM hospital) शस्त्रक्रियागृहातील विद्युत प्रणालीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. या अंतर्गत लिकेज विद्युतप्रवाह रुग्णाच्या शरीरात प्रवाहित न होणे तसेच लिकेज विद्युतप्रवाह बिघाड झाल्यास शस्त्रक्रिया विभागातील विद्युतप्रवाह खंडित न होणे, यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्यात येणार आहे.

उपकरणे थेट रुग्णाच्या संपर्कात आल्यास

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात (KEM hospital) मोठ्या प्रमाणात रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत असतात. त्यातील किरकोळ आजारांवरील रुग्णांना बाह्य रुग्णसेवेद्वारे उपचार केले जातात, तर काही गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील रुग्णांना दाखल करून घेतले जाते. अशा गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील जटील तसेच इतरही विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये काही विद्युत उपकरणे रुग्णांच्या थेट संपर्कात येतात. शस्त्रक्रिया विभागात विविध उच्च क्षमतेचे मशीनरी वापरल्या जातात. शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या उपकरणामध्ये काही बिघाड झाल्यास लिकेज विद्युतप्रवाह तयार होतो. अशी उपकरणे थेट रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.

(हेही वाचा – Indian Navy : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात वाढवली गस्त; काय आहे कारण ?)

शस्त्रक्रिया विभाग हा अतिसंवेदनशील

शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याने १ मिली ऍम्पियर एवढा कमी विद्युतप्रवाहसुद्धा रुग्णाच्या जीवितास घातक ठरू शकतो. जागतिक विद्युत नामांकनानुसार शस्त्रक्रिया विभाग हा गट २ म्हणजेच अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी लिकेज विद्युतप्रवाह रुग्णाच्या शरीरात प्रवाहित न होणे तसेच लिकेज विद्युतप्रवाह बिघाड झाल्यास शस्त्रक्रिया विभागातील विद्युतप्रवाह खंडित न होणे, यासाठी रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(KEM hospital)

सुमारे साडेसहा कोटींचा खर्च

त्यामुळे केईएम रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्म इंडिकेशनसह मेडिकल आयसोलेशन पॅनलची बसवण्यात येणार असून या कामासाठी ओम टेक्निकल सोल्युशन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (KEM hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.