दहिसर जंबो कोविड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठ्याला येणार बळकटी!

११० कोविड आयसीयू व्हेंटिलेटर्स बेड्सच्या अनुषंगाने ऑक्सिजनचा पुरेसा दाब मिळण्यासाठी येथील मेडिकल गॅस सिस्टीच्या रचनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहिसर, कांदरपाडा येथील जंबो फॅसिलिटी सेंटरमध्ये सध्या असलेल्या विद्यमान मेडिकल गॅस पाईपलाईनमधून ऑक्सिजनच्या कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे आता यात सुधारणा करण्यात येत आहे. सध्याच्या पाईपलाईनमध्ये सुधारणा करून या सिस्टीमच्या रचनेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे या जंबो कोविड सेंटरमध्ये वाढणाऱ्या भाविष्यातील ११० आयसीयू व्हेंटिलेटर्सचा भार पेलता येणार आहे.

११० आयसीयू व्हेंटिलेटर्स कोविड बेड्सला फायदा होणार!

दहिसर कांदरपाडा जंबो कोविड सेंटर हे सर्व सुविधांसह जून २०२०मध्ये सुरु करण्यात आले. या जंबो कोविड सेंटरमध्ये सर्व वैद्यकीय सुविधांसह मेडिकल गॅस पाईपलाईनही तेव्हाच सुरु करण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये व्हेंटिलेटर्सवर असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तसेच विविध प्रकारचे व्हेंटिलेटर्स व त्यांचे विविध सेंटिंग्स असल्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा दाब एकसमान राहत नाही. तसेच विविध ठिकाणी सध्या असलेले ७७ एचडीयू आणि ३३ आयसीयू बेड्स हे पूर्णपणे ११० आयसीयू व्हेंटिलेटर्स कोविड बेड्स करण्यात येणार आहे. परंतु ११० आयसीयू व्हेंटिलेटर्स कोविड बेड्सच्या अनुषंगाने ऑक्सिजनचा पुरेसा दाब मिळण्यासाठी या मेडिकल गॅस सिस्टीच्या रचनमेध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री!)

मेडिकल गॅस सिस्टीमध्ये होणार सुधारणा!

यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामांसाठी यापूर्वी या पाईपलाईनचे काम करणाऱ्या एमडीडी मेडिकल सिस्टीम या कंपनीकडून करुन घेण्यात येत आहे. याबाबत विद्युत व यांत्रिक विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्याच्या दहिसर कांदरपाडा येथील कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मेडिकल गॅस सिस्टीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याची जी काही समस्या आहे ती दूर करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here