मुंबईत मागील २० दिवसांमध्ये १ हजार २२८ आयसीयू बेड वाढले, तरीही…

मागील २० दिवसाांमध्ये विद्यमान आरोग्य सुविधेच्या २५ ते ४५ टक्के एवढ्या सुविधेत वाढ केली. पण वाढत्या रुग्ण संख्येपुढे ही सर्व सुविधा सुद्धा अपुरी पडताना दिसत आहे.

84

मुंबईत मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन पाठोपाठ आता आयसीयू बेडचीही मागणी जोरात वाढू लागली आहे. आयसीयू बेडच्याा प्रतीक्षेत अनेक रुग्ण घरीच राहत असून, शेवटी अत्यंत चिंताजनक झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, रुग्णंची गरज ओळखून मुंबईमध्ये आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. मागील तब्बल २० दिवसांमध्येच आयसीयूचे १ हजार २२८ बेड, ऑक्सिजनचे २०५२ बेड आणि ४२१ व्हेंटीलेटरची सुविधा वाढवली आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवली असली, तरी घरी उपचार घेत असताना प्रकृती चिंताजनक होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून त्यापुढे ही सुविधाही अपुरी पडताना दिसत आहे.

मुंबईमध्ये २२ एप्रिलपर्यंत ८३ हजार ९५३ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र, यातील जास्त गंभीर असलेले, मध्यम लक्षणे असलेले, तसेच दीर्घकालीन आजाराचे २१ हजार ३३१ रुग्ण महापालिकेसह खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

२० दिवसांत ४२१ व्हेंटीलेटर वाढले

१ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १ हजार ५९५ एवढेच आयसीयू बेड हेाते. ज्याची संख्या २० तारखेपर्यंत २ हजार ८२३ एवढी झाली. २० एप्रिलला २ हजार ७७२ रुग्ण आयसीयूत दाखल हेाते आणि ५१ बेड रिकामे होते. त्यामुळे २० दिवसांमध्ये महापालिकेने तब्बल १ हजार २२८ आयसीयू बेडची संख्या या कालावधीत वाढवली. व्हेंटीलेटरची संख्या १ एप्रिल रोजी १ हजार २६ एवढीच होती, ती २० एप्रिल रोजी १ हजार ४४७ एवढी झाली. त्या दिवसापर्यंत व्हेंटीलेटरवर १ हजार ४३२ रुग्ण दाखल होते आणि १५ बेड रिकामे होते. त्यामुळे जर २० दिवसांचा आढावा घेतला, तर तब्बल ४२१ व्हेंटीलेटरची संख्या या कालावधीत वाढवली गेली.

(हेही वाचाः ऑक्सिजन पुरवठ्यासाठी महापालिकेने बनवली ‘एसओपी’! असा मिळणार वेळेत ‘प्राणवायू’)

तरीही सुविधा पडते अपुरी

याशिवाय ऑक्सिजनच बेडचीही संख्या मागील २० दिवसांमध्ये २ हजार ५२ ने वाढवली गेली. १ एप्रिल रोजी संख्या ८ हजार ५९९ एवढी होती, जी २० एप्रिलला १ हजार ६५१ एवढी झाली. यामुळे २० तारखेला असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या ९ हजार ८२७ एवढी होती. म्हणजे ८२४ बेड रिक्त होते. मागील २० दिवसाांमध्ये विद्यमान आरोग्य सुविधेच्या २५ ते ४५ टक्के एवढ्या सुविधेत वाढ केली. पण वाढत्या रुग्ण संख्येपुढे ही सर्व सुविधा सुद्धा अपुरी पडताना दिसत आहे.

तर पुढील काही दिवस हे मृत्यूचे आकडे वाढवणारे

मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लक्षणे नसलेले जे रुग्ण आहेत ते जर योग्य उपचार घेत असतील, तर ते बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण बऱ्याच रुग्णांची ऑक्सिजनची पातळी घसरुन ते चिंताजनक होण्याचे प्रमाणही काही प्रमाणात आहे. असे रुग्ण जर वेळीच उपचारासाठी दाखल झाले, तर त्यांना ऑक्सिजन बेडवर सामावून घेत त्यांच्यावर पुढील उपचार केले जातात. पण बहुतांशी रुग्ण हे आयसीयू बेड आणि खासगी रुग्णलयातच दाखल होण्याची प्रतीक्षा घरी बसून करत आहेत. ज्यामुळे बहुतांशाी रुग्णांची प्रक्रृती खालावली जात असून, असे रुग्ण आययीसूमध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणालाच उपचारासाठी असे रुग्ण दाखल होत असल्याने, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सध्याची मुंबईतील आयसीयू आणि व्हेंटीलेटरची संख्या पाहता ही संख्या अपुरीच असून, भविष्यात काही दिवसांमध्ये आयसीयू बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यूही संभवतो. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मृत्यूचे आकडे वाढणारे असतील, अशी भीती खुद्द डॉक्टरांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.

(हेही वाचाः आपत्कालीन कारणासाठी प्रवास करायचा आहे, काय करायचे? वाचा महाराष्ट्र पोलिसांचे उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.