‘आसमान से दवा’ : आता ड्रोनद्वारे मिळतील घरपोच औषध! ‘या’ राज्यात सेवा झाली सुरू

102

औषधे विकत घेण्यासाठी आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. कारण आता लवकरच ‘आसमान से दवा’ ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून आता ग्राहकांना ड्रोनद्वारे औषधे पोहोचवली जाणार आहेत. अरुणाचल प्रदेश या राज्यात या पायलट प्रोजेक्टला सुरूवात झालेली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली असून राज्यामध्ये सोमवारी आसमान से दवा (Medicine From The Sky) याअंतर्गत औषधांच्या ड्रोनची पहिली गगण भरारी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार १ रुपयांत बसप्रवास; योजनेला मुदतवाढ )

आसमान से दवा (Medicine From The Sky) 

ड्रोनच्या माध्यमातून पूर्व कामेंग जिल्ह्याच्या सेप्पा ते च्यांग ताजो पर्यंत यशस्वीरित्या ड्रोन सर्व्हिस लॉंच करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दिली. भारताला ड्रोन हब बनवण्याच्या ड्रोन पॉलिसीअंतर्गत अरुणाचल प्रदेशमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी अरुणाचल प्रदेशच्या राज्य सरकारला जागतिक आर्थिक मंचची (World Economic Forum) मदत मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार राज्य सरकारने आरोग्य, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे असेही अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

https://twitter.com/PemaKhanduBJP/status/1559124704782602241

अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात आसमान से दवा (Medicine From The Sky) या प्रकल्पाला व्हर्च्युअल लॉंच करण्यात आले आहे.

https://twitter.com/PemaKhanduBJP/status/1559127188158709760

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.