Medicines Prices : अँटिबायोटिक्ससह 800 औषधे महागणार; काय आहे कारण ?

Medicines Prices : इथे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

262
Medicines Prices : अँटिबायोटिक्ससह 800 औषधे महागणार; काय आहे कारण ?
Medicines Prices : अँटिबायोटिक्ससह 800 औषधे महागणार; काय आहे कारण ?

1 एप्रिलपासून महत्त्वाच्या आणि सर्रास वापरात असणाऱ्या औषधांचे दर वाढणार आहेत. यामध्ये पेनकिलरपासून अँटिबायोटीक्सपपर्यंतच्या श्रेणीतील औषधांचा समावेश आहे. औषध कंपन्यांना सरकारकडून अॅन्युअल होलसेल प्राईज (WPI) म्हणजेच वार्षिक घाऊक दरवाढीसाठी मान्यता देण्यासाठी सकारात्मक भूमिकेत दिसत असून 1 एप्रिलपासून हे वाढीव दर लागू होणार असल्याचे म्हटले जात आहे. (Medicines Prices)

(हेही वाचा – Bombay High Court : समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; उच्च न्यायालयाचा आदेश)

0.0055% दरवाढ देण्याची तयारी

ज्या Essential Medicines च्या दरात वाढ होणार आहे, ती औषधे मोठ्या संख्येने नागरिकांच्या वापरात असतात. या औषधांचे विक्री दर आणि दरांबाबतच्या इतर गोष्टी सरकार निर्धारित करत असते. औषध कंपन्या एका वर्षात अधिकाधिक 10 टक्के दरवाढ करू शकतात. कॅन्सरविरोधी औषधांचाही या यादीत समावेश आहे. शासनाकडून औषधांच्या किमतींमध्ये .0055% दरवाढ देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मागील वर्षी आणि विशेष म्हणजे 2022 मध्ये या औषधांमध्ये 12 ते 10 टक्के वाढ करण्यात आली होती. परिणामी आता होणारी वाढ किरकोळ स्वरूपातील असेल, असे जाणकारांचे मत आहे.

औषधांची वाढती मागणी पाहून दरवाढीचा निर्णय

प्राथमिक माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून पॅरासिटामोल, अॅनिमियाविरोधी औषधे, अझिथ्रोमायसिन, विटामिन आणि खनिजयुक्त औषधे, मध्यम स्वरूपातील कोविडची (Covid) लागण झालेल्या रुग्णांसाठी वापरली जाणारी औषधे आणि स्टेरॉइडचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने या औषधांचा दरवाढीचा प्रश्न उपस्थित केला जात होता. औषधांची वाढती मागणी पाहता हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. (Medicines Prices)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.