जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन वाढ, वीज, भाजीपाला, खाद्यतेल यांच्या किंमतीततही वाढ झाली आहे. काही गरजांबाबत तडजोड करता येते. परंतु, अनेक आजारांवर औषधे घेण्याशिवाय पर्याय नाही. औषधांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. तसेच, डॉक्टरांची शुल्क आणि वैद्यकीय विम्याचे हप्ते वाढल्याने सर्वांनाच आर्थिक फटका बसू लागला आहे.
औषधांच्या किंमती वाढल्या
आता अवर्गीकृत औषधांच्या किमती वाढल्या आहेत. १०० रुपयांचे औषध दहा टक्क्यांनी वाढून त्याची किंमत ११० रुपये होऊ शकते; पण मागणी जास्त आहे म्हणून त्याची किंमत १२० रुपये करू शकत नाहीत. मुंबईत किंवा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये किमती फार वाढल्याची एकही तक्रार नोंद झालेली नाही, असे एफडीए (मुख्यालय)चे सहआयुक्त डॉ. दा. रा. गहाणे यांनी सांगितले.
(हेही वाचा: आता एकाच पुस्तकात सगळे विषय; पाठ्यपुस्तकांचे ओझे होणार कमी )