Meerut मधील पोलीस ठाण्यात चक्क इफ्तार पार्टीचे आयोजन; पोलिस प्रभारींवर निलंबनाची कारवाई

82
Meerut मधील पोलीस ठाण्यात चक्क इफ्तार पार्टीचे आयोजन; पोलिस प्रभारींवर निलंबनाची कारवाई
Meerut मधील पोलीस ठाण्यात चक्क इफ्तार पार्टीचे आयोजन; पोलिस प्रभारींवर निलंबनाची कारवाई

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) चक्क एका पोलीस ठाण्यातच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे इफ्तार पार्टीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच एसएसपी विपिन ताडा यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना निलंबित केले आहे. दि. १७ मार्च रोजी एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी लोहियानगरमधील (Lohianagar) झाकीर कॉलनी पोलीस ठाण्याचे (Zakir Colony Police Station) उद्घाटन केले. त्यानंतर काही दिवसांनी पोलिस ठाणे प्रमुख शैलेंद्र प्रताप यांच्या परवानगीशिवाय पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

( हेही वाचा : राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढणार; Adv. Ashish Shelar यांची मोठी घोषणा)

या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर दि. २५ मार्च रोजी व्हायरल झाला. त्यानंतर व्हायरल व्हिडिओची दखल घेत, एसएसपींनी तात्काळ प्रभारींना पोलिस ठाण्यातून हटवून त्यांची पोलीस मुख्यालयात ड्युटी लावली गेली आहे. या इफ्तार पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक पोलीस अधिकारी हा इफ्तार पार्टीसाठी लागणारे जेवण बनवताना दिसत होते. यानंतर, एसएसपी विपिन ताडा (Vipin Tada) यांनी शैलेंद्र गुप्ता (Shailendra Gupta) यांना लाईन ड्युटीवर ठेवले. तरी या इफ्तार पार्टीवेळी (Iftar party) अनेक पोलिस अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होते.

दरम्यान पोलिसांनी रस्त्यावर ईद-उल-फित्रची नमाज अदा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एफआयआरसोबत आरोपींचे पासपोर्ट रद्द करण्याबाबतचा अहवालही दिला जाईल. जेणेकरून तो मक्का आणि मदिना येथे प्रवास करू शकणार नाही. त्यामुळे ईदगाहसमोरील रस्त्यावर नमाज अदा करू नये असे सर्वांना स्पष्ट करण्यात आले. जवळच्या मशिदींमध्ये नमाज अदा करावी. गेल्या वर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिस अहवालही तयार करत आहेत. गेल्या वर्षी रस्त्यावर नमाज अदा केल्यानंतर अनेक लोक कामासाठी परदेशात गेले होते. काही लोक उमराहसाठी गेले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.