उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये होळीच्या दहनासाठी देणगी घेण्याकरता काही हिंदू तरुण फिरत असताना काही मुसलमान तरुणांनी त्यांना ‘आमच्याकडून देणगी घ्या आणि इस्लाम कबूल करा’, असे म्हणत त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान तरुणांमध्ये वाद झाला, या वादाचे दंगलीत रूपांतर झाले आणि दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यात २ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून अजूनही तणाव आहे.
स्थानिक रहिवासी अमित गुप्ता, सोनू प्रजापती आणि मुलू ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरातील हरीनगर परिसरात ५० वर्षांपासून होळी दहनाची परंपरा आहे. यासाठी स्थानिक हिंदू नागरिक देणगी गोळा करत होते. त्यावेळी त्या भागाचे नगरसेवक शहजाद मेवाटी, त्यांचा भाऊही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या हिंदू तरुणांच्या भावना दुखावण्यास सुरुवात केली. ‘आमच्याकडून देणगी घ्या आणि इस्लाम कबूल करा;, असे ते म्हणाले. यानंतर शाहजाद आणि त्याच्या साथीदारांनी हिंदू तरुणांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अमित आणि मुल्लू यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या मुसलमान तरुणांनी होळीवर लाथ मारून तिचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक तणाव वाढला आणि अर्धा तास दोन्ही बाजूंनी दगडफेक होत राहिली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले, तर अमित आणि मुलू यांना गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते.
(हेही वाचा चंदेरी गडावर शिवरायांच्या ८५ किलो मूर्तीची केली स्थापना; शिवप्रेमींच्या भगीरथ प्रयत्नांना यश)