Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक; मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार

'मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली; पण इथून पुढे तसे होऊ देणार नाही', अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

322
Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक; मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार
Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक; मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा वाशीपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी मनोज जरांगे आझाद मैदानातच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन थांबवावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Jeevan Raksha Padak : महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर)

आईच्या बाजूच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार का ?

राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. बैठकीत तोडगा निघाला नाही, तर आझाद मैदानात (Azad Maidan) जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. ‘मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली; पण इथून पुढे तसे होऊ देणार नाही’, अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

कुणबी प्रमाणपत्र हे वडिलांच्या बाजूच्या नातेवाईकांबरोबर आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील मिळवीत ही मनोज जरांगेंची मागणी आहे. कुणबी प्रमाणपत्रे ही वडिलांच्या बाजूच्याच नातेवाईकांना देता येतील अशी सरकारची आतापर्यंतची भूमिका राहिली आहे. आता ही मागणी मान्य होते का, हे स्पष्ट होईल.

पहाटे 5 वाजता मनोज जरांगे पाटील हे वाशी (Vashi), भुसार मार्केट येथे पोहोचले. त्यांच्या हस्ते मार्केट आवारात ध्वजवंदन करण्यात आले. ‘मुंबईत रोज 60 ते 70 लाख लोक नोकरीनिमित्त किंवा कामांनिमित्त लोकलने ये-जा करतात. यामुळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजारांची आहे. या ठिकाणी आंदोलकांसाठी सोयी, सुविधा नाहीत. मुंबईतील भौगौलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे मुंबईत अधिक भार शक्य होणार नाही’, असे पोलिसांनी जरांगे यांना कळवले आहे.

(हेही वाचा – Jeevan Raksha Padak : महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर)

पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी मुंबईतील (Mumbai) खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कची (International Corporation Park) जागा दिली आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.