पुणे शहरातील ( Pune Airport) पुरंदर विमानतळ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लष्कराच्या लोहगाव विमानतळावरून पुणे शहरातील विमाने जात असतात. पुणे शहरातील पुरंदर येथे विमानतळ सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. यासंदर्भात आता जमीन संपादनासाठी हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आहे.
बारामतीसह ५ विमानतळांचा ताबा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लागणारी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून त्यांनी पुरंदर विमानतळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
(हेही वाचा- India vs Canada : अखेर कॅनडा नरमला; पीएम ट्रुडो यांनी घेतली ‘ही’ भूमिका)
याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती ही विमानतळे सुरू करण्यासाठी एमआयडीसीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवण्यास देण्यात आली होती.