२०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या आयोजनाची भव्यता पहाता त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत व्यापक स्तरावर नियोजित केले जात आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला भाविक, साधू-संत, महंत, महात्मे आणि देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. या पर्वाच्या आयोजनासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे. (Nashik Kumbh Mela 2027)
(हेही वाचा – जयंत पाटील आणि Ajit Pawar यांच्यात बंद दाराआड काय झाली चर्चा? दादांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…)
महंत अनिकेतशास्त्री यांना निमंत्रण
२४ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता नाशिक महानगरपालिके (Nashik Municipal Corporation) मार्फत सदर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी नाशिक येथील महर्षि पंचायतन सिद्धपिठाचे महंत अनिकेतशास्त्री महाराज (Mahant Aniket Shastri) यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) कुशावर्तासह (Kushavarta) इतर कुंडांचे सौंदर्यीकरण केल्यास भाविकांना तेथे जाता येईल. त्याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या शेजारील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Nashik Kumbh Mela 2027)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community