कतारचे (Qatar) अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी (Emir Sheikh) यांनी १७-१८ फेब्रुवारी २०२५ रोजी भारताचा दौरा केला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. भारत दौऱ्याच्या वेळी अमीर यांच्यासोबत त्यांचे मंत्री, अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही होते. पंतप्रधान मोदी यांनी १८ फेब्रुवारी रोजी हैदराबाद हाऊस येथे अमीर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : ‘समृद्धीवर सुविधा द्या, अन्यथा दंड भरा’ ; नागपूर खंडपीठाने तेल कंपन्यांना फटकारले)
आज माझे बंधू, कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी बैठक झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली कतारने प्रगतीची नवी उंची गाठली आहे. ते भारत-कतारमधील मजबूत मैत्रीसाठी देखील वचनबद्ध आहेत. ही भेट आणखी खास आहे कारण आम्ही आमचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले आहेत, अशी पोस्ट एक्स या माध्यमावर पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
Had a very productive meeting with my brother, Amir of Qatar H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani, earlier today. Under his leadership, Qatar has scaled new heights of progress. He is also committed to a strong India-Qatar friendship. This visit is even more special because we… pic.twitter.com/XQXM7ZkS6N
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2025
या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “आमच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा प्रमुख होता. आम्हाला भारत-कतार (India-Qatar) व्यापार संबंध वाढवायचे आहेत आणि त्यामध्ये विविधता आणायची आहे. दोन्ही ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या क्षेत्रातही एकत्र काम करू शकतात.”
नव्याने स्थापित झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यासह सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे मान्य केले. या वेळी दोन्ही देशांनी ‘द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापना करारा’वर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच या वेळी सुधारित दुहेरी कर टाळण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
🇮🇳-🇶🇦: List of outcomes during the State visit of HH Sheikh @TamimbinHamad Al-Thani, Amir of the State of Qatar to India. pic.twitter.com/bn8xEqwhRY
— Randhir Jaiswal (@MEAIndia) February 18, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्यातील बैठकीविषयी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही एक्सवर माहिती दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community