मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. १८.०८.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे :
ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन सकाळी १०.५० ते दुपारी ०३.२० पर्यंत (Mega Block)
उपनगरीय सेवांचे डायव्हर्शन
डाऊन जलद/अर्ध-जलद मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४६ वाजता सुटणारी बदलापूर लोकल ते दुपारी २.४२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल पर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.
कल्याण येथून दि. १०.२८ वाजता सुटणारी अंबरनाथ लोकल ते कल्याण येथून दुपारी ०३.१७ वाजता सुटणारी बदलापूर लोकल पर्यंतच्या अप जलद/सेमी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील आणि पुढे ठाणे स्थानकावरील अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
ट्रेन क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्पेस दि. १६.०८.२०२४ पनवेल शॉर्ट टर्मिनेट होईल.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट ओरीजनेशन
ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्पेस दि. १८.०८.२०२४ पनवेल येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
(हेही वाचा – Kolkata doctor rape-murder case: कोलकाता हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद; डॉक्टरांचा संप, रुग्णसेवा ठप्प)
मेमू सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन
मेमू क्रमांक 01339 वसई रोड-दिवा
वसई रोडवरून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी कोपरपर्यंत (सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल) चालेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
मेमू क्रमांक 01341 वसई रोड-दिवा वसई रोडवरून दुपारी १२.५५ वाजता सुटणारी गाडी कोपरपर्यंत (दुपारी ०१.३७ वाजता पोहोचेल) चालेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
मेमू क्रमांक 01340 दिवा-वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल आणि वसई रोडकडे चालेल, दुपारी १२.३० वाजता पोहोचेल आणि दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
मेमू क्रमांक 01342 दिवा-वसई रोड कोपर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटेल आणि वसई रोडपर्यंत चालेल, दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल आणि दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
मेमू क्रमांक 50104 रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत आणि डाउन हार्बर मार्गावर ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Mega Block)
डाउन हार्बर मार्गावर :
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.
गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ४.५१ वाजता सुटेल.
वांद्रेसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ४.५६ वाजता सुटेल.
(हेही वाचा – आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई; Ravindra Chavan यांनी दिले संकेत)
अप हार्बर मार्गावर :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ०३.२८ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल.
ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे. (Mega Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community