Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी

Mega Block News Mumbai : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र, ब्लॉक सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

262
Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या 'मेगाब्लॉक'ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी
Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या 'मेगाब्लॉक'ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने 30/31 मेच्या मध्यरात्रीपासून ते 2 जूनपर्यंत 63 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. (Mega Block News Mumbai) त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र, ब्लॉक सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

(हेही वाचा – भंपकपणाचे दुसरे नाव हे जितेंद्र आव्हाड; Pravin Darekar यांचा हल्लाबोल)

यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता मध्य रेल्वेने ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. रेल्वेच्या ब्लॉकमुळे शासकीय किंवा निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून ते 2 जून पर्यंत 63 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी 30/31 मेच्या मध्यरात्री ते 2 जूनच्या दुपारपर्यंत 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पर्यायी व्यवस्था करावी – राष्ट्रवादीची मागणी

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी केली. मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान 7 दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था करावी, मासिक पासधारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे केल्या.

एक्सप्रेस केल्या शॉर्ट टर्मिनेट

मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. (Mega Block News Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.