मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक २०.०४.२०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Mega Block) परिचालीत करणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी १५.५५ (०५.०० तास)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी १५.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी १५.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉक (Mega Block) दरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
(हेही वाचा – Murshidabad Violence नंतर मानवाधिकारवाल्यांच्या वॉलवर शुकशुकाट)
डाऊन धीम्या मार्गावर
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आहे जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.०७ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आहे जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १५.५७ वाजता सुटेल.
अप धीम्या मार्गावर
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून ०९.१३ वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण येथून १५.१० वाजता सुटेल.
- ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी १६.१० (०५.०० तास)
- ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३५ ते संध्याकाळी १६.०७ पर्यंत रद्द राहतील.
- पनवेल/नेरुळ/वाशी ते ठाणे अप हार्बर मार्गावरील सेवा १०.२५ वाजता वाशी ते नेरुळ १६.०९ वाजता रद्द करण्यात येतील.
हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mega Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community