मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. १० एप्रिल २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत हा मेगा ब्लाॅक घेण्यात आला आहे. (बेलापूर/नेरुळ- खारकोपर लाईन वगळून)
‘हे’ मार्ग बंद
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
( हेही वाचा: इंधन भडकले! वाहनचालक शेजारील राज्यात धावत सुटले…)
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- वाशी सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. या विशेष मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत.
Join Our WhatsApp Community