ऐन समारंभ, लग्न सराईत नागरिकांची खरेदीसाठी धावपळ सुरू असून, लोकल रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ०७ एप्रिल २०२४ (07 April 2024) रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी – नेरूळ अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्चिम रेल्वेच्या माहीम ते अंधेरी अप-डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega Block)
(हेही वाचा – Firing : पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाकडून एकावर गोळीबार)
मध्य रेल्वे
(Central Line) माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ०५ मिनिटे ते दुपारी ०३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. (Mega Block)
(हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट राज ठाकरेंना भेटले; चर्चेला उधाण)
ट्रान्स-हार्बर
(Trans Harbor) रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते सायंकाळी ०४ वाजून १० मिनिटांपर्यंत ठाणे-वाशी-नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. या दरम्यान, ठाणे येथून वाशी-नेरुळ ते पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी-नेरुळ ते पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यातील. (Mega Block)
पश्चिम रेल्वे
(western Line) तर पश्चिम रेल्वेच्या माहीम ते अंधेरी मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ०४ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या दरम्यान, माहिम ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप-डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ०४ वाजेपर्यत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी- बांद्रा, गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहील. तसेच चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद राहणार असल्याने रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आले आहे. (Mega Block)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community