‘सीआरपीएफ’मध्ये तब्बल १ लाख ३० हजार जागांवर लवकरच मेगाभरती!

113

केंद्रीय गृहमंत्रालयाने सीआरपीएफमधील 1 लाख 30 हजार जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

( हेही वाचा : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ महिलेने केली विनयभंगाची तक्रार, गुन्हा दाखल)

लेव्हल-3 ची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया

त्यानुसार केंद्रीय राखीव पोलीस दलात लेव्हल-3 ची पदे भरण्यासाठी थेट भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा माजी लष्करी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समकक्ष सैन्य पात्रता असावी. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 18 ते 23 वर्ष एवढी आहे.

उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रोबेशन कालावधी हा 2 वर्षांचा असेल. या पदाची वेतनश्रेणी 21 हजार 700 ते 69 हजार 100 अशी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटिसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, लवकरच या बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.