MPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. MPSC मार्फत मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १४ फेब्रुवारी होती. परंतु आता या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी आयोगाकडून एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
( हेही वाचा : व्हॉट्सअॅपवरून कसे काढाल तिकीट? मेट्रोसह मोनो रेल्वेच्या दैनंदिन माहितीसाठी ‘यात्री’ अॅप )
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त सेवा परीक्षेसाठी मुदत वाढ जाहीर करण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक २० जानेवारी रोजी संयुक्त सेवा परीक्षा म्हणजेच कम्बाईनसाठी जाहिरात काढण्यात आली होती. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी होती. दरम्यान आयोगाने परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यात तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या उमेदवारांचा पे स्केल १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० या दरम्यान असणार आहे.
Join Our WhatsApp Community