महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या(म्हाडा) अनेक मंडळांच्या अखत्यारितील कर्मचाऱ्यांची रिक्तपदे आता भरण्यात येणार आहेत. विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी म्हाडाच्यावतीने जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. याबाबत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुक्रवारी १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून प्रक्रिया राबवली जाणार आहे. या ऑनलाईन अर्जासाठी म्हाडाच्या http://mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर असलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
५६५ जागांसाठी भरती
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिरकणाच्या अखत्यारित आस्थापनातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि मृत पावल्यामुळे रिक्त झाली आहे. मागील अनेक वर्षांत म्हाडामध्ये कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती. परंतु आता विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी म्हाडाच्यावतीने ५६५ जागांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे.
(हेही वाचाः शुक्रवारी पुरुषांना लसीकरण केंद्रांवर नो एन्ट्री: का ते जाणून घ्या)
असा भरता येईल अर्ज
या जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संवर्गनिहाय पदांचा तपशील दिलेला आहे. रिक्तपदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, वेतनश्रेणी, सामाजिक व समांतर आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती व प्रक्रिया तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादींबाबतचा सविस्तर तपशील या संकेतस्थळांवर देण्यात आला आहे. शुक्रवारी १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल आणि १४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील, असे म्हाडाने या जाहिरातीत म्हटले आहे.
अशा आहेत जागा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : १३
उपअभियंता (स्थापत्य) : १३
मिळकत व्यावस्थापक/प्रशासकीय अधिकारी : २
सहायक अभिंयता (स्थापत्य) : ३०
सहायक विधी सल्लागार : २
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ११९
कनिष्ठ वास्तू शास्त्रज्ञ सहायक : ६
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : ४४
सहायक : १८
वरिष्ठ लिपिक : ७३
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक २०७
लघुटंकलेखक : २०
भूमापक : ११
अनुरेखक : ७
(हेही वाचाः मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपाची ही मागणी)
Join Our WhatsApp Community