MPSC मध्ये ८ हजार पदांची मेगा भरती!

110

कोरोनामुळे राज्यातील शासकीय नोकरभरती प्रक्रिया स्थगिती करण्यात आली होती. परंतु आता राज्य सरकारने नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

( हेही वाचा : आता एकाच वेळी व्हा दोन शाखांचे पदवीधर! )

३०० परीक्षांच्या माध्यमातून भरती 

कोरोनामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी होती. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावरील व निवृत्तवेतनावरील वाढता खर्च लक्षात घेऊन, राज्य सरकारने रिक्त पदभरती आणि नवीन नोकरभरतीबाबत संथगतीने वाटचाल सुरू ठेवली होती. परंतु आता राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे आगामी सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या ३०० परीक्षांच्या माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया (Mega Recruitment) राबवली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.

रिक्तपदे भरण्यास मान्यता 

राज्य सरकारने मे २०२० मध्ये आदेश काढून सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध हे विभाग वगळून इतर सर्व विभागातील नोकरभरतीवर निर्बंध लागू केले होते. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने हे निर्बंध मागे घेऊन लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.