Megablock update : प्रवाशांचा खोळंबा! रविवारी बाहेर पडण्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दिनांक २३ व २४ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

 • भायखळा – माटुंगा जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) दिनांक २३ जुलै २०२२ रोजी रात्री ११.३० पासून दिनांक २४ जुलै २०२२ च्या पहाटे ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
 • रविवार २४ जुलैला मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० पर्यंत सुद्धा या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद मार्गावरील गाडी भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
 • ठाणे येथून २३ जुलै रोजी रात्री १०.५८ आणि रात्री ११.१५ वाजता सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्गात बदल

 • ट्रेन क्रमांक12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
 • गाडी क्रमांक 11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल – वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
   (बेलापूर – खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त)
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून १०.०१ पासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

 • ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.
 • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील.
 • ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर गाड्या सुरू असतील.

हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here