रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर Megablock! वेळापत्रक एकदा बघाच

98
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर Megablock! वेळापत्रक एकदा बघाच
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर Megablock! वेळापत्रक एकदा बघाच

महिन्याच्या पहिल्याच दिवशी उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. रविवारी 1 सप्टेबरला हा मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा –Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा )

मध्य रेल्वेवर रविवारी 1 सप्टेबर 2024 रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. सकाळी 11.05 वाजता हा मेगाब्लॉक सुरू होईल. तो दुपारी 3.55 पर्यंत असेल. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी वरून माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावरील सेवा ही जलद मार्गावरून वळण्यात येणार आहे. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकात थांबतली. मुलुंड पुढे या लोकल पुन्हा डाऊन धिम्या मार्गावरून धावणार आहेत.

(हेही वाचा –National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार)

मध्य रेल्वेवरील (Central Railway) या मेगाब्लॉक (Megablock) मुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ही 15 मिनिटे उशिराने असेल. लोकल या पंधरा मिनिटे उशिराने धावतील. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावर ही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 11.10 मेगाब्लॉकला सुरूवात होईल. संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी या लोकल सेवा बंद असतील.

हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गवर जरी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल-वाशी या मार्गावर काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. या लोकल मुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळेल. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.