मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर Megablock ! घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा…

99
मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर Megablock ! घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा...
मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर Megablock ! घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा...

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या दि. १०/९/२०२४ रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत असल्याने हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे.

माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्याच्या पुढे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. (Megablock)

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील व माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येऊन गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचतील. (Megablock)

अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (Megablock)

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल- कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे वरील स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी राहील. (Megablock)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.