प्रवाशांचा खोळंबा! रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

131

यंदा मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. मुंबई विभागात दिनांक २३ व २४ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

ब्लॉक कालावधीत सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल १० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • भायखळा – माटुंगा जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) दिनांक २३ जुलै २०२२ रोजी रात्री ११.३० पासून दिनांक २४ जुलै २०२२ च्या पहाटे ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • रविवार २४ जुलैला मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० पर्यंत सुद्धा या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद मार्गावरील गाडी भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
  • ठाणे येथून २३ जुलै रोजी रात्री १०.५८ आणि रात्री ११.१५ वाजता सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्गात बदल

  • ट्रेन क्रमांक12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • पनवेल – वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
    (बेलापूर – खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त)
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून १०.०१ पासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.