मध्य रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत रविवारी (३ सप्टेंबर) मेगा ब्लॉक (Railway Megablock) परीचालीत केला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक नक्की बघा
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५.पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणिबेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
(हेही वाचा :Ajit Pawar : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आरोप करणारे जनतेशी दिशाभूल करतात – अजित पवारांचा हल्लाबोल)
विशेष उपनगरीय गाड्या
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- मानखुर्द या भागावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उपलब्ध असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community