Sunday Megablock : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ५ तास मेगाब्लॉक; फक्त याच स्थानकांवर थांबतील गाड्या

116

मध्य रेल्वे मार्गावर रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : गणेशोत्सवासाठी १८ ऑगस्टपासून सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान फेरी होणार सुरू)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धिम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
  • घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशी करीता जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

  • तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी- पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.