मध्य रेल्वेवर रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट इलेक्ट्रिक बसचे कंत्राट रखडणार? सर्वोच्च न्यायालय करणार परीक्षण)
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
ठाणे-कल्याण जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद/सेमी जलद गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील व १० मिनिटे उशिराने स्थानकांवर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील पुढे मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
विशेष गाड्या
या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
Join Our WhatsApp Community