मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : …पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया )
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- विद्याविहार – ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाईनवर सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- या ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.