रविवारी घराबाहेर पडताय? ‘या’ कालावधीत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक!

160

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : …पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया )

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • विद्याविहार – ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाईनवर सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • या ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
    चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या 

  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.