येत्या रविवारी सुद्धा मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा मेगाब्लॉकमुळे खोळंबा होणार आहे. २५ डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : 27 डिसेंबरला मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक)
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
- सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- वडाळा रोड ते मानखुर्द या हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित होणार नाही) - पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
- ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द या मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community