५ मार्चला लोकलच्या कोणत्या स्थानकांदरम्यान असणार मेगाब्लॉक? पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वे मार्गावर रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांची निवडणूक आयोगाला दिली शिवी; म्हणाले… )

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • ठाणे ते कल्याण दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

  • 12126 पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
  • या वेळेतील सर्व मेल/एक्सप्रेस फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

शॉर्ट टर्मिनेशन मेमू सेवा

  • वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
  • दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांमध्ये विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here