येत्या रविवारी तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर त्याआधी तुम्ही लोकलचे मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या… मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही, पुणे महापालिकेचे आदेश)
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.
- घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community