मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ०९.०७.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
विद्याविहार – ठाणे ५वी आणि ६वी लाईन सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक असणार आहे.
तर ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
(हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी पाठवली शिवसेनेसह ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस)
कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community