पश्चिम ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावरील (Harbour Railway )पनवेल स्थानकांत ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने मध्य रेल्वेने रविवारच्या नियमितपणे घेण्यात आलेला ब्लॉक रद्द केला होता. बेलापूर ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद असल्याने हार्बरवासियांचे सुट्टीच्या दिवशी प्रचंड हाल झाले होते . मात्र आता याच कामासाठी आणखी पाच दिवसांच्या दररोज मध्य रात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सोमवार ते शुक्रवार पर्यत (२ ते ६ ऑक्टोबर) असणार आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
शनिवारपासून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वे एक प्रमुख ब्लॉक चालवत आहे. त्यानंतर पनवेल येथे लोकल यार्डात स्टॅबलिंग मार्गिका क्रमांक १,२,३,४ आणि १० च्या कामासाठी २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२३ पर्यत दररोज मध्य रात्री १२. ३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यत ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ह्या पाच दिवसांच्या ब्लॉककालावधीत लोकल सेवा रद्द असणार आहे. (Harbour Railway)
(हेही वाचा : Narendra Modi : घराणेशाही पक्ष कुटुंबाच्या कल्याणात गुंग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका)
रविवारच्या मेगाब्लॉकचा फायदा रिक्षा चालकांनी घेतला असून अव्वाच्या सव्वा प्रवाशांकडून भाडे आकारल्याच्या घटना घडल्या. मात्र, पनवेल ते कळंबोली जवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे मेल- एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. तसेच ३८ तासांचा मेगाब्लॉकमुळे कोकणातून येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्यामधून प्रवाशांना पनवेल स्थानकातुन घरी परतण्यासाठी खाजगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला.
शेवटच्या लोकलची वेळ
सीएसएमटी पनवेल रात्री १०.५८ वाजता
ठाणे-पनेवल लोकल रात्री ११.३२ वाजता
पनवेल-ठाणे लोकल रात्री १०.१५ वाजता
पहिल्या लोकलची वेळ
ठाणे-पनेवल लोकल सकाळी ६. २० वाजता
पनवेल-सीएसएमटी लोकल पहाटे ५. ४० वाजता
पनेवल-ठाणे लोकल सकाळी ६. १३ वाजता
हेही पहा –