मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.
( हेही वाचा : कोकणात जाताना नो टेन्शन! उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ )
वाहतूक पूर्णपणे बंद
परशुराम घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम असल्यामुळे २५ एप्रिलपासून २५ मेपर्यंत हा घाट सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नेमक्या कोणत्या वेळात वाहतूक बंद ठेवायची याचा निर्णय आगामी २ दिवसांत घेतला जाणार आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामाला गती देऊन पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारण्यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.
फलक लावत माहिती द्यावी
काम सुरू करण्यापूर्वी परशुराम घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल या मार्गावर याबाबतचे फलक लावून माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली. घाटात काही वळणांवर अपघात होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहेत. त्याची उभारणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.