रविवारी बाहेर जाताय? जाणून घ्या मेगाब्लॉक Update

91

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ३१ जुलैला मेगाब्लॉक नाही परंतु विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार ३१ जुलैला ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईन विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : फक्त १४९९ रुपयांमध्ये करा हवाई प्रवास! ‘या’ विमान कंपनीची शानदार ऑफर )

ट्रान्स हार्बर लाइन मेगाब्लॉक

  • ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणार्‍या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

विशेष गाड्या

  • ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

    हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.