आठवड्याच्या शेवटी मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांची गैरसोय होते परंतु यंदाच्या रविवारी मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल. रविवार १ मे २०२२ रोजी केवळ ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )
ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक
-
- रविवार १ मे रोजी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान मेट्रोसाठी आरएच गर्डर्स टाकण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
- ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.२० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करता सुटणाऱ्या गाड्या आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी ९.४८ ते सायंकाळी ४.१९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या बंद राहतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण दरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल / गोरेगाव विभागांमधील हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
View this post on Instagram
प्रशासनाने व्यक्त केली दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. या विशेष मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.