रविवारी मुंबईकरांचे होणार मेगा’हाल’; लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर Mega block

50

मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार, 19 जानेवारी (January 19 mega block) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा (Central Railway) माटुंगा मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग, तर ठाणे- वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) बोरीवरी ते भाईदर अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे मेगाहाल होणार आहे. (Mega block)

मध्य रेल्वे-

कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यत

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

(हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश )

ट्रान्स-हार्बर –

कुठे – ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर

कधी – सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis २० ते २४ जानेवारी दरम्यान दावोसमध्ये; महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा दौरा)

पश्चिम रेल्वे –

कुठे – बोरिवली – भाईंदर अप जलद मार्गावर

कधी – सकाळी ९.३० ते १.३० वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान सर्व अप जलद मार्गावरील लोकल सेवा विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.