वडिलांची युक्ती आली कामाला! ‘असा’ लागला मतिमंद मुलाचा शोध!

डोंबिवली रेल्वे पोलिसांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात शुक्रवारी १९ वर्षांचा मुलगा फलाटावर एकटाच फिरत असतांना एक मुलगा महिला पोलिस अधिकारी यांना मिळाला होता.

97

मतिमंद अथवा मूकबधिर मुले हरवल्यास त्यांचा शोध घेणे अथवा तो कुणाला मिळून आला, तरी त्यांच्या पालकांचा शोध घेणे कठीण होऊन बसते. मात्र एका वडिलांनी आपला मुलगा मानसिकदृष्टया कमजोर असल्यामुळे तो हरवल्यास त्याचा शोध लागावा म्हणून चक्क त्याच्या हातावर स्वत:चा मोबाईल क्रमांकच गोंदवला होता, वडिलांची हीच युक्ती कामाला आली आणि रेल्वे पोलिसांना सापडलेल्या या मानसिकदृष्टया कमजोर मुलाच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांना अधिक कष्ट घ्यावे लागले नाही.

मुलाला फक्त नाव सांगता आले!

डोंबिवली रेल्वे पोलिसांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात शुक्रवारी १९ वर्षांचा मुलगा फलाटावर एकटाच फिरत असतांना डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या एका महिला अधिकारी यांना तो मुलगा मिळाला होता. या अधिकाऱ्याने त्या मुलाकडे पालकाबाबत तसेच त्याचे नाव आणि पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र हा मुलगा मानसिकदृष्टया कमजोर असल्यामुळे त्याला केवळ त्याचे नाव अंकित आणि जबलपूर एवढेच आठवत होते. काहीही सांगता येत नव्हते.

(हेही वाचा : मंत्री परबांनंतर सेनेच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर!)

आणि पोलिस पोहचले मुलाच्या वडिलांपर्यंत!

अखेरीस त्याला डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली, मात्र तो केवळ त्याचे नाव अंकित आणि गाव जबलपूर एवढेच त्याला आठवत होते. वारंवार चौकशी करून देखील त्या मुलाला नाव आणि जबलपूर एवढेच आठवत होते. चौकशी दरम्यान पोलिसांचे लक्ष त्याच्या डाव्या हातावर गेले असता त्या हातावर कुठला तरी क्रमांक गोंदवलेला होता. पोलिसानी नंबर तपासला असता तो मोबाईल क्रमांक असल्याचे कळताच पोलिसांनी त्या क्रमांकावर फोन लावला असता मोबाईल क्रमांक हा मुलाच्या वडील नारायण सिंग ठाकूर यांचा असल्याचे कळले व ते मध्यप्रदेश येथे राहणारे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

वडिलांची काढला हा उपाय!

पोलिसांनी त्यांना सर्व हकीकत सांगून मुलाला घेण्यासाठी डोंबिवली येथे बोलवून घेतले. शनिवारी मुलाचे वडील नारायणसिंग ठाकूर हे मुलाच्या जन्माचे सर्व कागदपत्रे आणि त्याची ओळखपत्र घेऊन डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी मुलाच्या पालकांची ओळख पटवून मुलाचा ताबा वडिलांच्या ताब्यात दिला. माझा मुलगा मानसिकदृष्टया कमजोर असल्यामुळे तो कुठेही निघूनजातो, त्यामुळे आम्ही त्याच्या हातावर मोबाईल क्रमांक लिहला होता. आज तीच युक्ती कामी आली आणि मुलगा मिळाला असे वडील नारायण सिंग ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.